हिरव्या कोल्ड्रिंकच्या बाटलीत आढळला जिवंत कोळी

0
86

अन्नपदार्थांमध्ये आढळलेल्या असामान्य वस्तूंच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान, आता कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील एका ग्राहकाला सीलबंद कोल्ड ड्रिंकच्या बाटलीमध्ये कोळी सापडला आहे. उपलब्ध व्हिडिओनुसार, हिरव्या कोल्ड्रिंकच्या बाटलीत जिवंत कोळी आढळून आला. यापूर्वी आइस्क्रीममध्ये मानवी बोट, हर्शीच्या चॉकलेट सिरपच्या बाटलीत मृत उंदीर, अहमदाबादमध्ये सांबारच्या भांड्यात मृत उंदीर सापडल्यानंतर आता हे प्रकरण समोर आले आहे. तत्पूर्वी, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका अंगणवाडीत सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांसाठी असलेल्या माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत वितरित केलेल्या पाकिटात मेलेला साप आढळून आला होता.

पहा व्हिडिओ –