धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या, प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना

0
268

झारखंड ची राजधानी रांची मध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण रांचीमधील रिंगरोडचे आहे. येथे स्पेशल ब्रँचमध्ये तैनात असलेल्या सब इन्स्पेक्टरला गोळी लागली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अनुपम कछाप, असे या उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांचा मृतदेह रांची रिंगरोड येथून सापडला आहे. स्थानिक नागरिकांना ही घटना कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, अनुपम यांच्या हत्येची माहिती मिळताना पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली. सध्या रांची पोलिसांचे पथक या संपूर्ण घटनेचा तपास करण्यात व्यस्त आहे. जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

या घटनेनंतर भाजप झारखंडचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी रांची येथील रिम्स रुग्णालयात जाऊन मृत उपनिरीक्षक अनुपम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. मृत अनुपम कछाप हे 2018 बॅचचे उपनिरीक्षक होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here