धक्कादायक! चौथे अपत्य म्हणून मुलगी झाल्यामुळे नाराज होऊन वडिलांनी केली पोटच्या बाळाची हत्या

0
221

 

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील एका गावात तीन मुलींनंतर चौथी मुलगी झाल्यामुळे नाराज झालेल्या पित्याने एका महिन्याच्या मुलीची हत्या केली. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक संजय कुमार वर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील भरठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रपुरा गावात बबलू कुमार दिवाकर याने चौथे अपत्य म्हणून मुलगी झाल्यामुळे नाराज होऊन एक महिन्याच्या मुलीला तिच्या आईच्या मांडीवरून नेले. रविवारी तिला मद्यधुंद अवस्थेत जमिनीवर फेकले. गंभीर जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बबलूची पत्नी दीपूच्या तक्रारीच्या आधारे, बबलूविरुद्ध बीएनएस कलम 105 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्मा यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपी बबलूला गुरुवारी अटक केली. त्याने सांगितले की, बबलूने दोनदा लग्न केले आहे, त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुली होत्या आणि पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दीपूशी दुसरे लग्न केले. पोलिसांनी सांगितले की, दीपूपासून एक मुलगी आहे. तीन मुली झाल्यानंतर नुकतीच चौथी मुलगी जन्माला आल्याने बबलूला नैराश्य येऊ लागले आणि त्याने दारू पिण्यास सुरुवात केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here