धक्कादायक ! मुंबईतील एका बेस्ट बस कंडक्टरवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला

0
497

मुंबईतील एका बेस्ट बस कंडक्टर यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी घडली. अशोक डगळे असं हल्ला झालेल्या कंडक्टरचे नाव आहे. बस मार्ग क्रमांक ७ वर ड्युटीवर असताना अचानक एका अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या घटनेनंतर ते गंभीर जखमी झाले असून सद्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धारावीच्या पिवळा बंगाला स्टॉपवर गुरुवारी ड्युटीवर असताना एका कंडक्टरवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्लेखोरांनी दरोड्याच्या उद्देशाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात अशोक जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायन येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

या हल्ल्यानंतर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी संताप व्यक्त केले आहे. या घटनेचा निषेध केला आणि अशा गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका केली. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपी शाहबाज खान याला अटक केले आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि चाकू जप्त केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here