धक्कादायक! तक्रार मागे घेतली नाही म्हणून तीन जणांनी पत्रकाराला भोसकून मारले

0
270

पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात नुकत्याच पत्रकाराावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन जणांनी त्यांना भोसकून मारले. या घटनेप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश राजेश कंधार (२२), ओम राजेश कंधारे (१८), राजेश विठ्ठल कंधारे (५०) अशी आरोपीची नावे आहे. मे महिन्यात दाखल तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यास त्याने नकार दिला. पत्रकार राहुल अशोक बानगुडे असं हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते एरंडवणे येथील रहिवासी आहे.

१७ ऑगस्ट रोजी गणेश मंदिराजवळ भालेकर वस्ती येथे राहुल मोबाईलवर बोलत असताना यश कंधारे हा घटनास्थळी आळा. त्यांच्यात पूर्व वैमन्यासातून वाद सुरु झाला. याच दरम्यान कंधारे यांनी बानगुडे यांना धमकी दिली. त्यानंतर कंधारे यांनी कोयता काढून पत्रकारावर हल्ला चढवत ‘तुझी तक्रार लवकर मागे घ्या, अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल.

थोड्याच वेळाने इतर दोन जण आले. घटनास्थळी राहुलला बेदम मारहाण केली. पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु राजेश आणि ओमने त्याचा पाठलाग केला आणि मारहाण केली. राहुलवर चोरीची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. हल्ल्यात राहुल यांना हाताला आणि अंगावर दुखापत झाली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here