धक्कादायक! मेट्रोचं काम सुरु असलेल्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू

0
163

मुंबईत काल संध्याकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत प्रचंड पाणी साचलं होतं. हाच पाऊस एका महिलेसाठी कर्दनकाळ ठरला आहे. मुंबईतील एका मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक पण तितकीच दुर्दैवी घटना घडली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड सीप्सजवळ मॅनहोलमध्ये पडून या महिलेने जीव गमावला. सीप्झजवळ मेट्रो लाईन-3चे काम सुरू असून तेथील एक मॅनहोलचे झाकण उघडे होते. चालता चालता ती महिला त्या मॅनहोलजवळ पोहोचली, मुसळधार पावसामुळे ते झाकण उघडे असल्याचा तिला अंदाज नव्हता. अचानक ती खाली पडली आणि वाहून गेली.

घटनेची माहिती मिळताचअग्निशमन दलानं तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एक ते दीड तास सर्च ऑपरेशन राबवून त्यामहिलेला नाल्यातून बाहेर काढलं. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा जीव वाचू शकला नाही.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विमल गायकवाड ( वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. मुंबईत कालपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. काल रात्री विमल या काम संपवून रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास घरी परत जात होत्या. त्या सिप्झ कंपनीच्या परिसरात पोहोचल्या , रास्ता क्रॉस करत होत्या. तेथेच मेट्रोच्या कामासाठी खड्डा खणण्यात आला होता, मात्र त्यावर कोमतही झाकण टाकलेलं नव्हतं. क्रॉस करताना विमल यांना त्या खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि त्या धाडकन खाली कोसळल्या. तेथून त्या शंभर ते दीडशे मीटर दूरपर्यंत वाहून गेल्या.

महिला खड्ड्यात कोसळल्याचे समजताच अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. महिलेच्या शोधार्थ शोधमोहिमही सुरू करण्यात आली. तब्बल एक-दीड तास तिचा शोध सुरू होता. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला शोधून बाहेर कआढल, तिला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. . सध्या एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मेट्रो 3 लाईनचे 5 तारखेला उद्घाटन होणार आहे. मात्र त्या पूर्वीच तेथे एका महिलेचा बळी गेला आहे. या घटनेमुळे नागरिक संतापले असून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here