धक्कादायक! 4 वर्षीय चिमुकल्याचा खेळताना Manhole मध्ये पडून मृत्यू, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

0
347

अंगणात खेळता खेळता मॅनहोलमध्ये पडून एका 4 वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात रविवारी 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. समर शेख असं मृत मुलाचे नाव आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

समर शेख असे 4 वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. मॅनहोलवर झाकण ठेवण्यात आले होते. याच झाकणावर समर शेख हा उभा होता. मात्र, झाकण कुचकामी असल्याने समर हा मॅनहोलमध्ये पडला. पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही समर हा कुठे दिसत नसल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध घेतली. 5 तास शोध करूनही तो कुठेही दिसून आला नाही. यावेळी एका व्यक्तीने हौदात डोकावून बघितले असता, समरचा मृतदेह हौदाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला.

व्हिडीओ पहा:

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here