धक्कादायक! रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून 3 महिलांचा मृत्यू

0
166

 

रेल्वे प्रशासन नेहमी रेल्वे रूळ ओलांडून जाऊ नका. तसेच धावत्या रेल्वेत चढू नका असे वारंवार सांगत असते. तरीही काही जण आपला जीव धोक्यात टाकतात आणि जीव गमावतात. केरळमधील कासारगोड येथून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कांजनगड रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी रात्री रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून तीन महिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची माहिती दिली.

महिला जवळच्या एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या.महिला दक्षिण कोट्टायम जिल्ह्यातील चिंगावनम येथील रहिवासी आहेत. रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ती रुळ ओलांडत असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर एका सुपरफास्ट ट्रेनने त्यांना धडक दिली आणि तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, तपास सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here