एका गॅरेजमध्ये कारच्या बोनेटमधून मोठा अजगर आढळून आला आहे. अजगर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गॅरेजमध्ये घडली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एका कारमध्ये अजगर आढळला. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. एकाने या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही वेळातच वनविभागाकडून अजगरला रेस्क्यू करण्यात आले आहे.
पहा व्हिडीओ:
स्कॉर्पियो का बोनाट खोलने पर निकला अजगर, देखते ही देखते मची अफरा तफरी
मामला प्रयागराज: सिविल लाइन्स, होटल अजय इंटरनेशनल के सामने कार एसी के गेराज का बताया जा रहा है#VideoViral #viralreelsシ @DM_PRAYAGRAJ @UoA_Official pic.twitter.com/Epcc6m52L0— SunilMishra (@SunilMishra9394) September 15, 2024