ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

लोकप्रिय मालिका ‘देवयानी’ मधील शिवानी सुर्वेची नवीन मालिका तुमच्या भेटीला;पहा जबरदस्त प्रोमो

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेनंतर आता ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही नवी लवकरच सुरू होत आहे. या नव्या मालिकेतून ‘स्टार प्रवाह’चे जुने व लोकप्रिय चेहरे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘देवयानी’ फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे व ‘गोठ’ फेम अभिनेता समीर परांजपे ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. अशातच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.

१७ जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सुरू होणारी ‘थोडं तुझं थोडं माझं’ नव्या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे मानसी सणस या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर अभिनेता समीर परांजपे तेजस प्रभूच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय अभिनेत्री मानसी कुलकर्णी, प्रणव प्रभाकर असे बरेच कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये नवी जोडी पाहायला मिळत आहे. ज्या गायस्त्री प्रभू मानसीच्या आदर्श असतात त्याच गायस्त्री प्रभूच्या विरोधात तेजस असतो. कारण गायस्त्री ही तेजसची वहिनी असते. ही वहिनी त्यांचा वाडा विकण्यासाठी प्रयत्न करत असते पण तेजस सही न देऊन करार रद्द करत असतो. त्यामुळे आता गायस्त्रीला आदर्श मानणारी मानसी आणि गायस्त्रीच्या विरोधात असणारा तेजस एकत्र कसे येतात? यांचं नातं कसं तयार होतं? हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे. पण या नव्या प्रोमोमुळे शिवानी सुर्वे व समीर परांजपे यांची नवी जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

 

दरम्यान, अभिनेत्री शिवानी सुर्वे ‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेद्वारे तब्बल ९ वर्षांनी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर झळकणार आहे. तर अभिनेता समीर परांजपे ८ वर्षांनी पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’वर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हे जुने चेहरे नव्या रुपात प्रेक्षकांची मनं कितपत जिंकतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

पहा प्रोमो :

instagram.com/reel/C7p4r6sy_o9

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button