एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वाघीण, जंगलात पंख पसरून मोराला नाचताना पाहून गुपचूप त्याच्याजवळ जातो आणि त्यावर हल्ला करतो, पण पुढच्याच क्षणात असे काही घडते, जे पाहून होईल आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होईल. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @rawrszn नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओमध्ये, एक वाघिण मोरांच्या गटावर हल्ला करताना दिसत आहे, परंतु पुढच्या क्षणी तिची सर्व रणनीती वाया जाते, कारण मोर चतुराईने आपला जीव वाचवतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वाघिणीने मोराला पाहताच ती त्याची शिकार करण्यासाठी घात घालून बसते. मोर पंख पसरून नाचत असतो, जेव्हा वाघीण शांतपणे झुडपातून बाहेर येते आणि मोरावर हल्ला करते, पण मोर आपल्या सतर्कतेने वाघिणीचा डाव उधळून लावतो. वाघिणीला पाहताच मोर चटकन उडून एका उंच झाडावर बसतो आणि वाघिणी ते पाहत राहते.
पहा व्हिडीओ:
instagram.com/reel/C9Qv3ems3Bx