विधान परिषदेत १७ विजयी उमेदवारी यादी एका क्लिकवर ; नाशिक मध्ये एकनाथ शिंदे यांना धक्का

0
36

मुंबई | प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत 17 पैकी तब्बल 16 जागांवर कब्जा केला आहे. 18 जून रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे उर्वरित 11 जागांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

निकालानंतर महायुतीचा राज्यभर बोलबाला दिसून आला. भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या असून शिवसेनेने 3, राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला आहे. तर एका जागेवर अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

नाशिकमध्ये महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले. हा निकाल महायुतीसाठी धक्कादायक मानला जात आहे.

दरम्यान, स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एकूण वैध मतांच्या 50 टक्के अधिक एक मत असा विजयाचा कोटा निश्चित केला जातो. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते.

विधान परिषदेच्या 17 जागांचा निकाल पुढीलप्रमाणे :

  • ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना) – बिनविरोध
  • यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – बिनविरोध
  • रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
  • पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
  • वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर – अरुण लखाणी (भाजप) – बिनविरोध
  • अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप) – बिनविरोध
  • छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट (भाजप)
  • नाशिक – गोकुळ गिते (अपक्ष)
  • भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
  • सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप)
  • परभणी-हिंगोली – सईद खान (शिवसेना)
  • सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप)
  • धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप)
  • नागपूर – राजीव पोतदार (भाजप)
  • जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप)
  • अमरावती – प्रवीण पोटे (भाजप)
  • नांदेड – अमर राजूरकर (भाजप)

या निकालामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here