उष्माघाताने राज्यात दुसरा बळी; १७ वर्षीय तरुणीचा झोपेतच मृत्यू

0
2

छत्रपती संभाजीनगरमधून उष्माघाताने 24 तासाच दोन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.सोयगाव तालुक्यातील घोसला येथे १७ वर्षीय युवतीचा उष्माघाताने मृत्यू झाला. सुमन सर्जेराव पवार असे त्या तरूणीचे नाव होते. आईसोबत शुक्रवारी शेतात गेली तेव्हा उन्हामुळे तिला शुक्रवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटतं होते.

रात्री झोपल्यानंतर शनिवारी सकाळी सुमन उठत नसल्याचे पाहून तिला उठवण्याचा घरच्यांनी प्रयत्न केला. ती हलत नसल्याचे पाहून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. रात्री झोपेतच तिचा मृत्यू झाला होता. सोयगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी सोयगावमधील तापमानाचा पारा ४४ अंशावर होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्ते सामसूम होतात. सगळे झाडांच्या सावलीत निवारा शोधत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here