उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मधगंज भागातील एका इमारतीवरून व्यक्तीला टेरेसवरून फेकले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जीवे मारण्याच्या प्रयत्नातून तरूणाला टेरेसवरून फेकल्याचे सांगण्यात येत आहे. पाच जणांनी मिळून तरुणाला टेरेसवरून फेकल्याचे व्हिडिओत दिसत आहे. एकाने ही घटना फोनमध्ये कैद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित, अंकूर, गौरव आणि आणखी दोन जणांनी मिळून तरुणाला इमारतीच्या टेरेसवरून फेकले. तिघांन्ही मिळून पीडित तरुणाला भरपूर मारहाण केली. टेरेसवरून फेकल्यानंतर पीडित जमीनीवर पडला होता. त्यानंतर देखील आरोपींनी त्याला लाथा बुक्क्याने मारहाण केली. जीवे मारहाण्याच्या प्रयत्नातून पीडितेला इमारतीच्या टेरेसवर मारहाण केली आणि त्यानंतर त्याला रागाच्या भरात टेरेसवरून फेकले. सुदैवाने तरुण या घटनेतून वाचला आहे. परंतु त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत यावर कारवाई सुरु केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. टेरेसवरून फेकल्याने तरुणाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस या घटनेचा नेमक कारण शोधत आहे. आरोपीसंदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पहा व्हिडीओ :
x.com/…ankamal/status/1794443977313128808