
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी ही कपोलकल्पित आहे ती हटवण्यात यावी ही मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. वाघ्या कुत्रा होता आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली ही कथा काल्पनिक आहे त्याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच ही समाधी हटवण्यासाठी सरकारला ३१ मेपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र शिवप्रतिष्ठान संस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडेंनी संभाजी राजे चुकीचं बोलत आहेत असं म्हटलं आहे.
वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली ही कथा सत्य आहे. त्यामुळेच त्याचं स्मारक उभारण्यात आलं आहे. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. देशाशी आपल्याला एकनिष्ठ रहायचं आहे याचं द्योतक म्हणून ते स्मारक हवंच. वाघ्या कुत्र्याच्या नावावर जे चाललं आहे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले जे बोलत आहेत ते १०० टक्के चूक आहे. ती कुत्र्याने उडी घेतली ही कथा सत्य आहे.