रिक्षा आणि दुचाकीची धडक , उपमुख्यमंत्री अजित पवार अपघातग्रस्ताच्या मदतीला, पहा व्हिडीओ

0
445

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. याचवेळी सकाळी शहरातील संचेती रुग्णालयाजवळील पुलाखाली एका दुचाकीचा अपघात झाला. रिक्षा आणि दुचाकीची धडक झाली होती. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौऱ्यावर असताना अपघातग्रस्ताची मदत केली. अपघातात जखमी असलेल्या तरुणाच्या मदतीसाठी त्यांनी धाव घेतली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अजित पवार यांचे कौतुक केले आहे.

मिळालेल्या माहितीसाठी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी निवासस्थानाहून सर्किट हाऊसच्या दिशेने जात होते. त्याचवेळी शहरातील संचेती रुग्णालयाच्या पुलाखाली एका दुचाकीचा अपघात झाला. भरधाव रिक्षेची दुचाकीला धडक लागली होती. यावेळी अजित पवार यांनी तत्परता दाखवत ताफा थांबवला. सुरक्षा कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांसह स्वत: अजित पवार कारमधून खाली उतरले आणि अपघातग्रस्त तरुणाची मदतीसाठ धाव घेतली. तरुणाची विचारपूस केली. ताफ्यातील उपस्थित डॉक्टरांना उपचार करण्यासाठी सांगितले.

अपघातग्रस्त तरुणाला किरकोळ जखम झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिली. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे कार्यतत्परता दिसून येते. अपघातग्रस्त तरुणाने अजित पवार यांचे आभार देखील मानले. त्यानंतर ते पुढील कामासाठी निघाले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यांचे कौतुक केले.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here