पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका तरुण उमेदवाराला तीन वेळा वाकून नमस्कार केला ; हा तरुण उमेदवार आहे तरी कोण?

0
623

माणदेश एक्सप्रेस/दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. बुधवारी घोंडा येथे मोदींची जाहीर सभा होत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी सर्व उमेवारांना मंचावर बोलावले होते. उमेदवार एक एक करून पंतप्रधान मोदींना मंचावर येऊन भेटत होते, तसेच त्यांचे आशीर्वाद घेत अभिवादन करत होते. मात्र यावेळी एक अजब प्रकार पाहायला मिळाला. जिथे सर्व उमेदवार मोदींचे हस्तांदोलन करत होते, तिथे एका तरुण उमेदवाराला पंतप्रधान मोदींनी वाकून तीन वेळा नमस्कार घातला. या घटनेमुळे मंचावरील उपस्थित नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

 

 

पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रवींद्र सिंह नेगी (वय ४५) यांना वाकून नमस्कार केल्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. नेगी यांच्यानंतर विश्वास नगरचे उमेदवार ओम प्रकाश शर्मा यांनीही मोदी यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मध्येच अडविण्यात आले. याआधीही जाहीर कार्यक्रमात मोदींनी त्यांच्या पाया पडणाऱ्या लोकांना थांबविले होते. पंतप्रधान मोदी कुणालाही त्यांच्या पाया पडू देत नाहीत, अशी कृती करणाऱ्यांना त्यांनी अनेकदा अडवले आहे.