सूरज चव्हाण प्रमुख भूमिकेत असलेला ‘राजाराणी’ चित्रपटाचा पोस्टर लाँच

0
393

मुंबईतील ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनाला भाविकांची मोठी रांग लागत आहे. काही चित्रपटांचे पोस्टरही बाप्पााच्या साक्षीने लाँच करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील सत्यघटनेवर आधारीत राजाराणी चित्रपटाचे पोस्टर ‘लालबागच्या राजा’च्या चरणी लाँच करण्यात आले. या चित्रपटात बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) यंदाचा सीझन गाजवणारा स्पर्धक सूरज चव्हाणदेखील (Suraj Chavan) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या “राजाराणी” चित्रपटाचे पोस्टर “राजाराणी” चित्रपटाचे लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे , प्रमुख अभिनेता रोहन पाटील , सह निर्माते कार्तिक दोलताडे व टीम यांनी लालबागच्या राजाच दर्शन घेऊन पोस्टर प्रदर्शित केले. हा चित्रपटाची कथा ही ग्रामीण भागातील सत्य घटनेवर आधारीत आहे. नव्या दमाच्या आणि अनुभवी कलाकारांचं मिश्रण या चित्रपटात आहे. अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. राजाराणीच्या माध्यमातून सूरज चव्हाण ही आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सूरजची भूमिका असलेला ‘राजाराणी’ हा चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात सूरजची भूमिका काय?
”राजाराणी” या चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील प्रेमप्रकरणावर आहे. सूरज चव्हाण या चित्रपटातील नायक असलेल्या रोहन पाटीलच्या मित्राच्या भूमिकेत आहे. कठीण काळात मदत करणारा, मित्रावरील संकट आपले समजणारा, मित्र किती प्रामाणिक असावा, असे दर्शवणारी भूमिका या चित्रपटात सूरज साकारणार आहे.

चित्रपटात कोणते कलाकार?
रोहन पाटील , वैष्णवी शिंदे , तानाजी गळगुंडे , भारत गणेशपुरे , सुरेश विश्वकर्मा , भक्ती चव्हाण , माधवी जुवेकर आणि सूरज चव्हाण देखील महत्वाचा भूमिकेत दिसणार आहे. ‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. पी. शंकरम यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर यांनी आवाज दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here