खूपच साधेभोळे असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक; यांचा लोक नेहमीच घेतात गैरफायदा

0
6

अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशिष्ट गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगितली गेली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.

मूलांक 2 चे लोक अत्यंत भोळे असतात, त्यांचं मन नाजूक असतं आणि ते हळव्या स्वभावाचे देखील असतात. मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र (Moon) आहे, त्यामुळे स्वभावाने ते चंद्रासारखेच कोमल असतात. 2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक अत्यंत भावनिक, दयाळू आणि साध्या मनाचे असतात. या स्वभावामुळेच कधीकधी लोक यांचा फायदा घेतात. मूलांक 2 शी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

अत्यंत साधेभोळे असतात या जन्मतारखेचे लोक
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेले जन्मलेले लोक हे स्वभावाने अत्यंत भोळे असतात. हे लोक कोणाच्याही बोलण्यात लगेच फसतात. अनेक लोक यांचा गैरवापर करुन घेतात, स्वत:च्या फायद्यासाठी लोक यांचा वापर करतात. कधीकधी लोक यांची सहज फसवणूक करुन जातात, तरी त्यांना ते कळत नाही.

स्वभावाने हळवे असतात
वास्तविक, मूलांक 2 चा स्वामी चंद्र आहे. चंद्रामुळेच ते थोडे भावूक होतात. हे लोक प्रचंड हळव्या मनाचे असतात, त्यामुळे त्यांना कधीकधी मोठे निर्णय घेण्यात अडचणी येतात. समोरचा व्यक्ती एखाद्या संकटात असेल तर यांना लगेच भरुन येतं आणि मदतीसाठी ते पुढे सरसावतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन यांना लगेच रडायला येतं, कोणालाही दु:खात ते बघू शकत नाहीत.

नेहमी इतरांवर अवलंबून
असतात
मूलांक 2 चे लोक हे नेहमी कोणावर तरी अवलंबून राहतात. एकतर ते त्यांच्या जोडीदारावर किंवा इतर कोणावर तरी अवलंबून असतात. या लोकांना त्यांच्या कामात नेहमीच प्रोत्साहानाची, सहकार्याची गरज असते. ते जे कोणतं काम करतात, त्यात त्यांना कोणीतरी साथ देणारा हवा असतो, त्यांना त्या गोष्टीसाठी पुढे ढकलणारा हवा असतो.

कामात अपयश आल्यास लगेच होतात निराश
मूलांक 2 असलेल्या लोकांना एखाद्या कामात यश न मिळाल्यास ते लगेच निराश होतात. त्यांना अपेक्षित असलेली गोष्ट झाली नाही तर ते लगेच खचून जातात आणि पुन्हा उभारी घेण्यासाठी त्यांना वेळ लागतो.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून माणदेश एक्स्प्रेस कोणताही दावा करत नाही.)