ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

आमचा मुलगा MPSC करतोय… ‘या’ मुलाची लग्नपत्रिका पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, सोशल मीडियावर लग्नातील अनेक मजेशीर किस्से, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय हल्ली काहीजण लग्नाची पत्रिका देखील हटके पद्धतीने बनवतात दिसतात तर काहीजण लग्न पत्रिकेवर असं काहीतरी लिहितात जे वाचून कोणालाही हसू येईल. सध्या अशीच एक लग्नपत्रिका चर्चेत आली आहे. जिचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आपण अनेकदा पाहतो लग्नपत्रिकेवर वर आणि वधूचे शिक्षण किती झाले किंवा ते काय नोकरी करतात याबाबत त्यांच्या नावापुढे थोडक्यात माहिती लिहिलेली असते. सध्या व्हायरल होत असलेल्या पत्रिकेवर देखील नवऱ्याच्या नावापुढे अशाप्रकारची थोडक्यात माहिती लिहिली आहे. ज्याची कल्पना कोणीही केली नसेल.

या व्हायरल होणाऱ्या पत्रिकेवर, ‘चि. अमोल’ असे मुलाचे नाव लिहिले असून त्याच्या नावापुढे mpsc preparation म्हणजे तो सध्या एमपीएससी या स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असल्याचे लिहिले आहे. आतापर्यंत लोक काय नोकरी करतात किंवा त्यांनी कोणती पदवी घेतली आहे यासंदर्भात माहिती लिहिलेली आपण पाहिली आहे. पण या मुलाने लिहिलेली ही माहिती वाचून नेटकरी यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने ‘आता फक्त एवढंच बघायचं राहिलं होतं’, असे लिहिले आहे.

ही व्हायरल होणारी पत्रिका इन्स्टाग्रामवरील @mpsc_short_notes या अकाउन्टवर शेअर केली असून यावर आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय अनेक नेटकरी देखील यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “मला पण टाकावे लागेल असेच”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मी पण आयएएस प्रिपरेशन लिहिणार आहे”. तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “आमच्या जिल्ह्याचे नाव गाजवले भावाने”. तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “भावाच्या घरी ३० एकर शेती आहे.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button