सांगोला येथे रविवारी शाश्वत डाळिंब मार्गदर्शनाचे आयोजन

0
51

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगोला/प्रतिनिधी : सांगोला येथील सांगोला-जत रोडवरील मुक्ताई रिसॉर्ट येथे रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता ‘डाळिंबरत्न’ डॉ. बाबासाहेब गोरे यांचे मोफत डाळिंब मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे डाळिंब पिकवणे आणि टिकवणे आव्हानात्मक झाले आहे. त्यातच डाळिंबास मर आणि तेल्या या यासारख्या प्रमुख समस्या भेडसावत आहेत. सदर कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब गोरे नवीन डाळिंब लागवड, मृगभर व्यवस्थापन, मृगबहराचे अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

सदर कार्यक्रमास जास्तीत-जास्त शेतकरी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशराज गांडूळ प्रकल्प वाटंबरेचे उद्योजक सुरेश पवार, प्रगतीशील डाळिंब शेतकरी व डाळिंब मार्गदर्शक विजयसिंह वराडे आणि केजीएन डाळिंब फार्म नाझरेचे अशपाक काझी यांनी केले आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here