
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : विषारी औषध पिल्याने अतुल आबासो पवार (वय 38), रा. मणेराजुरी ता. तासगाव याचा मृत्यू झाला. याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मणेराजुरी येथील अतुल बाबासो पवार याने विषारी औषध पिल्याने त्याला आटपाडी येथील वरद हॉस्पिटल येथे अज्ञात कोणीतरी व्यक्तीने दिनांक २६ मार्च रोजी दाखल केले होते. प्राथमिक उपचार करून दिनांक २७ मार्च रोजी त्याला पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे पत्नी अनिता पवार यांनी दाखल केले होते.
परंतु सदर ठिकाणी उपचारादरम्यान सिविल हॉस्पिटल सांगली येथे अतुल पवार याचा मृत्यू झाला होता. सदर घटनेबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे डॉ. मृणाल कांबळे, सीएओ सिविल हॉस्पिटल सांगली यांनी गुन्हा दाखल केला होता. सदरचा दाखल गुन्हा आटपाडी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला. सदर घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.