
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : श्री गणेश वाचनालय शेटफळे येथे राज्यसेवा आयोगातून पीएसआय पदाला गवसणी घालणारे महेश अशोक गायकवाड, भारतीय रेल्वे विभागात टेक्निशियन म्हणून निवड झालेल्या सुरज अशोक गायकवाड व इंडियन नेव्ही मध्ये निवड झालेले दिग्विजय दत्तात्रय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री गणेश वाचनालयाचे अध्यक्ष दत्तात्रय कांबळे, प्रा.संभाजीराव पाटील, माजी सरपंच पांडुरंग गायकवाड, संभाजी गायकवाड, पी.एस. गायकवाड, किसन कांबळे, प्रभाकर गायकवाड, संजय गायकवाड यांच्यासह सुनिल लोहार, अरुण गायकवाड, सुरेश मोकाशी, अनिल गायकवाड, ए.टी. गायकवाड, मंगेश कांबळे, डी.एन. गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.