
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे विहिरीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खरसुंडी हद्दीत परशुराम मुरलीधर भांगे यांचे शेत असून विहिर आहे. या विहिरीमध्ये जगन्नाथ निवृत्ती साठे (वय 40), रा. पेड ता. खानापूर जि. सांगली हे पाण्यात पडल्याने बुडून मयत झाले.
सदर घटनेबाबत खरसुंडीचे पोलीस पाटील बापूराव पांडुरंग इंगवले यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद झाला असून, सादर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.