एक लैला, दोन मजून ; एकमेकांना भेटायला आले, अन एकाने दुसऱ्याच्या अंगावर घातली चारचाकी गाडी ; पुण्यातील घटना

0
1

पुणे : पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुशील भास्कर काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी घडलेली आहे.

निलेश शिंदे आणि सुशील काळे याची गर्लफ्रेंड एकच आहे. सध्या त्या युवतीचे सुशील काळे सोबत प्रेमसंबंध असून ती निलेश पासून दूर झालेली आहे. निलेश या तिला त्रास देत होत असत त्या प्रेयसीच म्हणणं आहे. रात्री उशिरा एक्स बॉय फ्रेंड निलेश हा युवतीला भेटायला आला होता. याबाबतची माहिती तरुणीने सुशीलला दिली. निलेश जेव्हा भेटायला आला तो युवतीशी बोलत होता त्यावेळी सुशीलने चारचाकी गाडीने निलेशला उडवलं. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमका वाद फक्त गर्लफ्रेंडवरुन झाला की अजून कोणत्या कारणावरुन झाली आहे का? , याची माहिती घेत आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सुशील काळेला पिंपरी- पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून बळजबरी करुन किंवा क्षृल्लक कारणावरुन अनेक राडे होताना पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here