एकीकडे दिवाळीची जोरदार तयारी अन्; दुसरीकडे चोरट्यांचा सुळसुळाट

0
596

माणदेश एक्सप्रेस न्युज/  पुणे:  शहरात घरफोड्या आणि चोरीच्या घटना सुरूच आहेत. बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांकडून बंद सदनिकांमध्ये घरफोडी, तर गर्दीत महिलांचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

दिवाळी सणानिमित्त बाजारात दागिने, कपडे खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असताना ही घटना घडली आहे.
याच गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारत आहेत. शिवाजीनगर, वाकडेवाडी बसस्थानकातही गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडत आहेत.

तुळशीबाग येथे पिरंगुटमधील महिलेच्या लहान मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी. टिळेकरनगरमध्ये खरेदी करून घरी निघालेल्या महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले.