आता ही परीक्षा पुन्हा होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने ‘NEET’बद्दल काय घेतला निर्णय?

0
135

NEET UG 2024 प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने या परीक्षेवरील मळभ दूर केले आहे. ही संपूर्ण परीक्षाच संशयाच्या फेऱ्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की पेपरचं कोणतेही ’सिस्टीमॅटिक ब्रीच’ झाले नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आणि अनेक वादांवर पडदा टाकला. आता ही परीक्षा पुन्हा होणार नाही, तर परीक्षेत देशात सगळीकडेच गोंधळ उडाला, पेपर लीक झाला हा आरोप न्यायालयात टिकला नाही, हे स्पष्ट झाले.

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय

आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की पेपरचं कोणतेही ’सिस्टीमॅटिक ब्रीच’ झाले नाही. पेपर लीक व्यापक प्रमाणावर झाला नाही. पेपर लीक फक्त पाटणा आणि हजारीबाग पुरतां मर्यादित होता. ⁠एनटीए ने यापुढे काळजी घ्यायला पाहिजे, अशी ताकीद पण न्यायालयाने दिली. आम्ही नीटच्या पुर्नपरिक्षेच्या मागणीला फेटाळत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

केंद्राचे टोचेल कान

या वर्षी जी गडबड झाली त्यावर केंद्र सरकारनं विचार केला पाहिजे. यापुढे अशा घटना व्हायला नाही पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले. ⁠संपूर्ण परिक्षा पद्धतीत कोणताही बिघाड नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितले. कोर्टाने कमिटीचा अहवाल तयार करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२४ चा कालावधी निश्चीत केला आहे.