सेल्फी घेण्याच्या नादात नवविवाहितेचा किल्ल्यावरून तोल जाऊन मृत्यू

0
3

 

मोबाईल आता जीवनाचा भाग बनला आहे. सतत २४ तास सोबत असणारा मोबाईल हे एकमेव गॅझेट झाले आहे. मोबाईलचा वापर घराघरात वाढला आहे. अगदी जन्मलेल्या मुलापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण मोबाईलचा सातत्याने वापर करतात. परंतु मोबाईलमधील फोटो आणि सेल्फी या प्रकारामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहे. फोटो आणि सेल्फी घेताना धाडस करणारे अनेक जण आहेत. त्यातील बऱ्याच जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. धारशिव जिल्ह्यातील नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात अशीच एक दुर्घटना घडली. सेल्फी घेण्याच्या नादात दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहिता तरुणीचा मृत्यू झाला. निलोफर अमीर शेख असे त्या तरुणीचे नाव आहे.

सेल्फी घेताना तोल गेला…
धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला आहे. राज्यातील भुईकोट किल्ल्यातील हा सर्वांत मोठा किल्ला आहे. या किल्ल्याची तटबंदी जवळजवळ ३ किलोमीटर लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात. निलोफर अमीर शेख या तरुणीचे लग्न दहा दिवसांपूर्वीच झाले. त्यानंतर ती पतीसोबत फिरण्यासाठी आली. नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील उपळाई बुरुजवरून सेल्फी घेण्याचा मोह तिला झाला. सेल्फी घेताना तोल जाऊन तरुणी पडली. त्यात तिचा मृत्यू झाला.

उपचार सुरु असताना निधन
नवीन संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या 22 वर्षीय निलोफर हिचे दहा दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. ती तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गावात राहत होती. ती किल्ल्यावरुन पडल्यानंतर गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने नळदुर्ग येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here