आटपाडीच्या शिरेपेचात मानाचा तुरा ; “यांचे” सीए परीक्षेत यश

0
1410
????????????????????????????????????

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीतील देवांग कोष्टी समाजातील सुशांत विजय दौंडे याने बिकट परिस्थितीत, जिद्दीने व चिकाटीने अनुकूल परिस्थितीवर मात करत अतिशय अवघड मानल्या जाणाऱ्या सीए परीक्षेमध्ये यश संपादन करून देवांग कोष्टी समाजा बरोबरच आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

त्याच्या या यशाबद्दल त्याचे व त्याचे चुलते कुमार प्रल्हाद दौंडे कुटुंबीयांचे अभिनंदन चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन राहुल सपाटे व आदर्श पतसंस्थेचे संचालक विकास भुते यांनी करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सुशांत विजय दौंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ आटपाडी येथे झाले आहे. तर पाचवी ते आठवी शिक्षण हे राजारामबापू हायस्कूल येथे झाले आहे. तसेच इयत्ता नववी ते दहावी चे शिक्षण हे राजेवाडी येथील संग्रामसिंह मोहिते-पाटील हायस्कूल या ठिकाणी झाले. तसेच उच्च शिक्षण हे आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय येथे संपन्न झाले.

लहान वयातच त्यांचे आई-वडिलांचे छत्र हरपले होते. त्यांचा सांभाळ चुलते कुमार दौंडे यांनी केले. घरची बेतातीच परीस्थिती असले तरी, त्यांनी शिक्षणात कोणताही खंड पडू दिला नाही. नुकताच सीए परीक्षेचा फायनल निकाल लागला. त्यांनी या परीक्षेत १६६ गुण मिळवीत यशाला गवसणी घातली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.