“कुठल्याही धर्माची थट्टा… हे काम कोणी नालायकच करु शकतो”, ‘हा’ क्रिकेटर खवळला

0
6

T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी टीम मैदानावर खराब खेळ दाखवत आहेच. त्याचवेळी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटुंची मैदानाबाहेरील कृती सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर टीका होतेय. अलीकडेच भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान माजी क्रिकेटर कामरान अकमलने शीख समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर हरभजनने कामरान अकमलला खूप सुनावल होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कामरान अकमलने शीख समाजाची माफी सुद्धा मागितली. पण हरभजन सिंगचा राग अजून शांत झालेला नाही. हरभजनने कामरान अकमलला आता नालायक म्हटलं आहे.

“कामरान अकमलच वक्तव्य खूपच बकवास होतं. कोणी नालायक माणूसच हे असं करु शकतो. कुठल्याही धर्माची थट्टा करण्याची आवश्यकता नाही हे कामरान अकमलला समजलं पाहिजे” असं हरभजन सिंग ANI शी बोलताना म्हणाला. हरभजन सिंगने कामरान अकमलला शीख धर्माचा इतिहास वाचण्याचा सल्ला दिला. “शिखांनीच मुस्लिम समाजाच्या आई आणि बहिणींच रक्षण केलं होतं, याची माहिती कामरान अकमलने घेतली पाहिजे” असं हरभजन सिंग म्हणाला. कामरान अकमलने लगेच माफी मागितली हे चांगलं झालं. पण त्याने शिखांच्या किंवा कुठल्याही धर्माच्या भावना दुखावू नयेत असं हरभजन म्हणाला. आम्ही हिंदू, इस्लाम, शीख आणि ख्रिश्नच सर्व धर्मांचा सन्मान करतो असं हरभजन म्हणाला. कामरान अकमल अनेक वर्ष पाकिस्तान टीमकडून क्रिकेट खेळलाय. 2009 मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा कामरान अकमल सदस्य होता.

एजाज अहमदच सुद्धा प्रक्षोभक वक्तव्य

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू एजाज अहमदने सुद्धा लाइव्ह शो मध्ये पाकिस्तानी टीमच्या पराभवानंतर प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं. पाकिस्तान टीममध्ये पठान जास्त झालेत, म्हणून टीम हरतेय असं त्याने म्हटलं होतं. पठान दबाव झेलू शकत नाही असं एजाज अहमद म्हणाला. एजाज अहमदच्या या वक्तव्यावर अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटुंनी नाराजी व्यक्त केली. एजाज अहमदने माफी मागावी अशी मागणी होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here