माणगंगा बचाव समितीची “या” दिवशी करगणीत सभा ; माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती

0
1378

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्याची अर्थवाहिनी असलेला, तीन जिल्हाचे कार्यक्षेत्र असलेला माणगंगा सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेने लिलाव काढून विक्री करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. माणगंगा सहकारी साखर कारखाना हा मूळ सभासदांचाच रहावा व तो सहकारामध्येच सुरू व्हावा, यासाठी माणगंगा साखर कारखाना बचाव समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरची सभा ही शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता करगणी ता. आटपाडी येथील बाजार पटांगणमध्ये राज्याचे माजी मंत्री, आम. सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत माणगंगा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचाच रहावा यासाठी भव्य सभेचे आयोजन केल्याची माहिती बचाव समितीचे अध्यक्ष तानाजी लवटे यांनी दिली. या सभेस आटपाडी, सांगोला, माण येथील सभासद, शेतकरी ,ऊस पुरवठादारक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही तानाजी लवटे यांनी केले आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here