“आपल्या मुलीला रडणारी नाही तर लढणारी बनवा” लाठी काठीचे प्रशिक्षण घेताहेत तरुणी, व्हिडीओ एकदा पाहाच

0
152

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये नेहमी स्त्रियांना दुय्यम स्थान मिळाले आहे. महिलांवरील वाढता अत्याचार, बलात्काराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकीकडे ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ चा नारा दिला जातो तर दुसरीकडे त्याच मुलींवरील अत्याचारांची मालिका सुरू आहे. अशावेळी मुलींनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी पुढे येणे गरजेचे आहे. आत्मसंरक्षणासाठी नवनवीन गोष्टी शिकणे महत्त्वाचे आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मुलींना शिवकालीन युद्ध कलेच्या प्रशिक्षण दिले जाते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल.

 

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मोठे मैदान दिसेल. या मैदानावर मुलीच्या हातात लाठी काठी दिली आहे आणि तरुण मंडळी त्यांना शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण देत आहे. लाठी काठीच्या साहाय्याने स्वत:चे संरक्षण कसे करायचे हे तुम्हाला या युद्ध कलेच्या प्रशिक्षणातून दिसून येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “आपल्या मुलीला रडणारी नाही तर लढणारी बनवा.” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 

 

“शिवकालीन युद्ध कलेच्या प्रशिक्षणासोबत आचार आणि विचारांची शिदोरी दिली जाते.. मन मनगट मेंदू सक्षम होतोच शिवाय विचारांनी महाराजांचा मावळा घडवला जातो… गेली १८ वर्षे ही शिवकालीन युद्ध केलेची सेवा अखंडितपणे सुरू आहे..

 

अखंड मर्दानी सेवा
जागर शिवकालीन युद्ध कलेचा
नाद मर्दानी बाज मर्दानी
जय शिवराय”

 

 

 

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लाठी काठी च प्रशिक्षण हे तर प्रत्येक गावात असलंच पाहिजे सर्व महाराष्ट्र मध्ये” तर एका युजरने लिहिलेय, “जय शिवराय दीदी” काही युजर्सनी त्यांच्या गावात किंवा शहरात हे प्रशिक्षण दिले जाईल का, हे विचारले आहे. काही युजर्सनी तर व्हिडीओ पाहून हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.