
भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये महेंद्रसिंह धोनीची कमालीची क्रेझ दिसून येते. आगामी आयपीएलमध्ये पुन्हा त्याची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले असताना धोनीची यंदाच्या हंगामा आधीची नेट्समधील पहिली झलक समोर आली आहे. महेंद्रसिंह धोनीने आगामी आयपीएल हंगामाची तयारी सुरु केली आहे.
जो फोटो व्हायरल होतोय त्यात धोनी नेट्समध्ये प्रॅक्टिस करताना दिसून येत आहे. धोनी हा क्रिकेटमधील एक ब्रँड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावरही त्याची क्रेझ कमी झालेली नाही.
२०१९ मध्ये सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून थांबतोय, असे सांगत धोनीनं अनेक चाहत्यांना धक्का दिला होता. पण त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला अन् आगामी हंगामासाठीही तो चेन्नईच्या ताफ्याता भाग झाला. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात CSK कडून तो अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात रिटेन झाला आहे. ही गोष्ट तशी धोनीसाठी घाट्याचा सौदा ठरली, पण चाहत्यांसाठी अन् CSK साठी पुन्हा एकदा तो मैदानात उतरणार ही मोठी पर्वणीच आहे.