जाणून घ्या , रक्तात किती प्रमाणात अल्कोहल सापडल्यावर ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल होतो

0
2

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राइव्हचा विषय चर्चेत आला आहे. पुण्यात अल्पवयीन आरोपीने कल्याणीनगर भागात भरधाव वेगाने पोर्शे कार पळवून दुचाकीस्वाकाराला उडवलं. या घटनेत एका तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. अपघाताच्यावेळी अल्पवयीन आरोपीने मद्य प्राशन केल्याचा आरोप आहे. अपघातापूर्वी पबमधील त्याचं दारु पितानाच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. आता पुण्याच्या ससून रुग्णालयात ब्लड सॅम्पल बदलण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ब्लड सॅम्पलमुळे आरोपी दारुच्या नशेत होता, हे सिद्ध होऊ शकतं. अशा प्रकरणात रक्तात किती प्रमाणात अल्कोहल सापडल्यावर ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल होतो? श्वासाद्वारे एखाद्याने मद्यपान केलय की, नाही हे पोलिसांना कसं समजत? त्या बद्दल जाणून घेऊया.

एखादी व्यक्ती दारु पिऊन गाडी चालवत आहे की नाही? हे शोधून काढण्यासाठी पोलीस ब्रीथ एनालाइजर मशीनचा वापर करतात.

ब्रीथ एनालइजर टेस्टमध्ये रक्तात दारुच प्रमाण किती आहे ते समजत. 100 एमएल रक्तात 30 एमजी अल्कोहल सापडलं, तर ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल होतो.

तोंड, गळा, पोट आणि आतड्यांच्या माध्यमातून दारु रक्तात मिसळते. कारण दारु पचत नाही. रक्त फुप्फुसांमधून प्रवाही असताना अल्कोहल श्वासांवाटे हवेत येतं.

ब्रीथ एनालाइजरमध्ये श्वास सोडल्यानंतर हे उपकरण रक्त्तात किती प्रमाणात दारु आहे, त्याची माहिती देतं. ड्रायव्हरच ब्लड सॅम्पल घेतल्याशिवाय शरीरात किती प्रमाणात दारु आहे, त्याची माहिती मिळते.

अमेरिकन मेडिकल असोसिएशननुसार, जेव्हा 100 एमएल ब्लडमध्ये अल्कोहलच प्रमाण 50 एमजी असतं, त्यावेळी ती व्यक्ती पूर्ण शुद्धीत नसते. म्हणून 100 एमएल ब्लडमध्ये 30 एमजी अल्कोहल सापडल्यानंतर ड्रिंक अँड ड्राइव्हची केस बनते.

ज्यावेळी कुठलाही माणूस दारु पितो, तेव्हा 20 टक्के अल्कोहल पोटात आणि 80 टक्के आतड्यांमध्ये मिसळतं. त्यानंतर रक्तात मिसळून दारु शरीरात पसरते.

दारु रक्त्तात मिसळल्यानंतर तीन पद्धतीने शरीराबाहेर येते. 5 टक्के टॉयलेट आणि 5 टक्के श्वासाद्वारे बाहेर येते. अन्य अल्कोहल एसिटिक एसिडमध्ये बदलतं. जी 5 टक्के दारु श्वासाद्वारे बाहेर येते तीच ब्रीथ एनालइजर टेस्टमध्ये सापडते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here