मुंबई फुटपाथवर बाईक पार्क करण्यावरून विदेशी पर्यटक महिलेने शेअर केली संतापजनक पोस्ट ,म्हणाली ‘भारतीयांना ….’

0
3

 

मुंबईत फुटपाथवर बाईक पार्ककरून पादचाऱ्यांचा रस्ता ब्लॉक करू पाहणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा व्हिडीओ नुकताच एका विदेशी पर्यटक महिलेने एक्सवर पोस्ट केला होता. त्याची दखल घेत मुंबई ट्राफिक पोलिसांकडून बाईकस्वारावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई ट्राफिक पोलिसांनी कलम 122/177 एमव्हीए अंतर्गत दुचाकीस्वारावर कारवाई केली आहे. हिल रोड येथे व्होडाफोन दुकानाशेजारील या घटनेचा व्हिडीओ महिलेने पोस्ट केला. त्याशिवाय, दुचाकीस्वाराच्या कृतीवर संतापही व्यक्त केला. व्हिडीओ सुरू असतानाच त्याला वारंवार विनंतीकरून बाईक फुटपाथवरून खाली उतरवायला लावली.

 

सोबत महिलेने लिहिले की, ‘फुटपाथ ड्रायव्हिंग/पार्किंगसाठी नसून पादचाऱ्यांसाठी आहे. ही माहिती लोकांना देण्याचा आणखी एक दिवस. लोकांना कायद्याचा अनादर करण्यात इतका अभिमान का वाटतो? याचा मला सर्वात जास्त धक्का बसला. शिवाय, भारतीय नेहमी इतरांना म्हणतात की, “भारतात तुमचे स्वागत आहे” हेच तुम्हाला जगाला दाखवायचे आहे?’,अशी संतापजनक पोस्ट महिलेने एक्स शेअर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here