मंत्र्यांच्या घरी चक्क कडुलिंबाच्या झाडाला लागले रसाळ आंबे; मंत्र्यांसकट सगळे झाले थक्क!

0
1

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या ठिकाणी पंचायत ग्रामीण विकास आणि कामगार विभागाचे मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या बंगल्यात लावलेले झाड अचानक चर्चेत आले आहे. हे झाड कडुलिंबाचे आहे, मात्र त्याला आंब्याची फळे लागली आहेत. शनिवारी जेव्हा मंत्र्यांनी हे झाड पाहिले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर या झाडाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. नवभारत टाइम्स डॉट कॉमने घटनास्थळी भेट दिली असता, त्यांनाही कडुलिंबाच्या झाडाला आंब्याची फळे येत असल्याचे दिसले.

याबाबत माहिती देताना मंत्री म्हणतात, ‘आज माझ्या भोपाळ येथील निवासस्थानी कडुलिंबाच्या झाडावर आंब्याची फळे पाहिल्यावर माझे मन आनंदाने भरून आले, हा प्रयोग काही कुशल बागायतदारांनी केला असावा, जो आश्चर्यापेक्षा कमी नाही.’ भोपाळच्या प्रोफेसर कॉलनीजवळ सिव्हिल लाइन्समधील बी-7 बंगला हे मंत्री प्रल्हाद पटेल यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या बंगल्याभोवती मोठ्या प्रमाणात झाडे आणि हिरवळ पसरलेली आहे. हे कडुलिंबाचे झाड देखील त्यापैकीच एक आहे. या झाडाला आंब्याची फळे लागली आहेत.

पहा व्हिडीओ :

x.com/…dspatel/status/1794029430375112894

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here