कोलेस्टेरॉल वाढलेलं असताना कोणत्या गोष्टी खाऊ नये आणि कोणत्या गोष्टी खाव्यात हे माहीत असणं फार गरजेचं आहे.

0
384

कोलेस्टेरॉल शरीराच्या कोशिकांसाठी खूप गरजेचं असतं. कोलेस्टेरॉल लिव्हरमधून तयार होतं. त्याशिवाय काही खाद्य पदार्थांमध्येही कोलेस्टेरॉल असतं. कोलेस्टेरॉल शरीरात योग्य प्रमाणात असणं महत्वाचं असतं. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात एक गुड कोलेस्टेरॉल आणि दुसरं बॅड कोलेस्टेरॉल. जेव्हा शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. तेव्हा आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात.

 

हाय कोलेस्टेरॉलमुळे हृदयरोगांचा धोका वाढतो. हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अशात हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी डाएटची खूप काळजी घ्यावी लागते. कोलेस्टेरॉल वाढलेलं असताना कोणत्या गोष्टी खाऊ नये आणि कोणत्या गोष्टी खाव्यात हे माहीत असणं फार गरजेचं आहे.

 

फळं आणि भाज्या

कोलेस्टोरॉल वाढलेलं असेल तर वेगवेगळी फळं आणि हिरव्या पालेभाज्या खाणं फायदेशीर ठरतं. फळं आणि भाज्यांमधून अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. फळं आणि भाज्या खाऊन बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं आणि गुड कोलेस्टेरॉल वाढतं.

 

कडधान्य

जर तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर तुम्ही कडधान्य खायला हवेत. कडधान्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. फायबर हे कोलेस्टेरॉलच्या रूग्णांसाठी खूप गरजेचं असतं. फायबरमुळे पचन तंत्र चांगलं राहतं. तसेच फायबरनं कोलेस्टेरॉल आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. तुम्ही जव आणि ब्राउन राइसही खाऊ शकता. यानं कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते.

 

नट्स आणि सीड्स

नट्स आणि सीट्स खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. नट्स आणि सीड्समध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. बदाम, काजू, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, कलिंगडाच्या बियांचा आहारात समावेश करा.

 

जेवण बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल

तुमची कोलेस्टेरॉल लेव्हल वाढली असेल तर जेवण बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर केला पाहिजे. ऑलिव्ह ऑइल हृदयासाठी खूप फायदेशीर असतं. या तेलामध्ये हेल्दी फॅट असतं, जे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं.

तेलकट पदार्थ खाणं टाळा

जर शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं असेल तर तुम्ही तेलकट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तेलकट पदार्थांमुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक वाढतं. तेलकट पदार्थांमध्ये अनहेल्दी फॅट्स असतात, जे हृदयरोगाचा धोका वाढवतात. तेलकट पदार्थ खाल्ल्यानं ब्लड शुगर, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तेलकट पदार्थ खाऊ नये.