IPL 2024 : पावसाची जोरदार ‘बॅटिंग’, सामना रद्द, स्पर्धेतून “या” संघांचे पॅकअप

0
1

आयपीएलच्या 63 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. परंतु पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही. बराच वेळ पाऊस थांबवण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र पाऊस न थांबल्याने अखेर सामान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. हा सामना रद्द झाल्याने गुजरात टायटन्सचं आयपीएलच्या 17 व्या मोसमातून पॅकअप झालं आहे.

गुजरात टायटन्ससाठी हा करो या मरो असा सामना होता. गुजरातला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोलकाता विरुद्ध विजय मिळवणं बंधनकारक होतं. मात्र सामन्याआधीच पावसाने नरेंद्र मोदी स्टेडियम आणि आसपासच्या भागात जोरदार बॅटिंग केली. पावसाची ही बॅटिंग गुजरातच्या विरोधात ठरली. बराच वेळ प्रतिक्षा पाहिल्यानंतर नाईलजाने अखेर सामना रद्द झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे मोठ्या आशेने सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्यांची आणि दोन्ही संघांची निराशा झाली आहे.

सामना रद्द झाल्याने गुजरात आणि कोलकाता दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आलाय. सामना रद्द झाल्याने गुजरातचं प्लेऑफमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंग झालंय. गुजरातला उर्विरित आणि अखेरचा सामना जिंकल्यानंतरही प्लेऑफमध्ये पोहचता येणार नाही. तर दुसऱ्या बाजूला केकेआरला 1 गुण मिळाल्याने त्यांचे एकूण 19 पॉइंट्स झाले आहेत. त्यामुळे केकेआर साखळी फेरीत किमान दुसऱ्या स्थानी राहिल. त्यामुळे केकेआरला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 संधी मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे.