
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द ता. आटपाडी येथे बुधवारी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व माजी वसुंधरा अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी पिंपरी खुर्द येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व माजी वसुंधरा अभियान यांच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहराच बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला चांगल्या प्रकारे सहकार्य केले असून गावातील शाळा, अंगणवाडी, आणि हायस्कूल यांसाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत सुविधांची शंभर टक्के पूर्तता करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावातील स्वच्छता आणि हरित वातावरणाला चालना मिळाली आहे.
तपासणी कमिटीचे प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सायमोते यांच्या अध्यक्षतेखाली गावाची पाहणी करण्यात आली. यावेळी समितीमध्ये सदस्य आठवले, उभारे आणि सुनील सावंत यांनी गावातील विकासकामांची पाहणी करत समाधान व्यक्त केले.