भारत-झिम्बाब्वे टी-20 सामन्यांची मालिका आजपासून खेळवली जाणार; ‘या’ ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल

0
62

भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका (T20I Series) आजपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे संध्याकाळी 4.30 वाजता खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे (Shubman Gill) आहे, तर झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व सिकंदर रझाकडे आहे. टी-20 विश्व क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे.

वास्तविक, भारतीय संघ विश्वचषक जिंकल्यानंतर प्रथमच झिम्बाब्वेविरुद्ध खेळत आहे. त्याचवेळी, आत्तापर्यंत भारत आणि झिम्बाब्वे आठ वेळा टी-20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर झिम्बाब्वेने भारताला दोनदा पराभूत केले आहे. दरम्यान, भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिका पाहता येणार आहे. याशिवाय, तुम्ही सोनी लाइव्ह ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here