IND vs CAN: विश्वचषकात पाऊस नसतानाही भारत वि कॅनडा सामना का रद्द झाला? जाणून घ्या कारण

0
18

भारत आणि कॅनडामधील टी-२० क्रिकेटमधील पहिलाच सामना विश्वचषकात खेळवला जाणार होता. पण फ्लोरिडामधील पावसाने व्यत्यय आणल्याने भारताचा हा सामना रद्द करण्यात आला आहे. सुपर८ च्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या कॅनडाचा हा स्पर्धेतील शेवटचा सामना होता. पण फ्लोरिडामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती, पण तरीही सामना रद्द का झाला, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

 

पहिले ३ सामने जिंकून भारताने सुपर८ मध्ये स्थान पक्के केले होते. भारत सुपर८ मध्ये पोहोचला तर अ गटात असल्याने A1 म्हणून सुपर८ मध्ये त्यांचे सामने होतील. हा सामना रद्द झाल्यामुळे भारताचे ७ गुण झाले आहेत. अमेरिका ५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

भारत-कॅनडा सामना का रद्द झाला?
फ्लोरिडामध्ये गेले काही दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसासोबतच शहराला पूराचा धोकाही दिला होता. अमेरिका आणि आयर्लंडमधील सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. यामुळेच अमेरिकेचा संघ सर्वाधिक गुणांसह भारतानंतर सुपर८ साठी क्वालिफाय झाला. ज्यामुळे पाकिस्तानला स्पर्धेबाहेर जावे लागले. पण नाणेफेकीपूर्वीच फ्लोरिडामध्ये पावसाने विश्रांती घेतली. पण तरीही सामना मात्र शेवटपर्यंत खेळवला गेला नाही. याचे कारण म्हणजे फ्लोरिडामधील सततच्या पावसामुळे मैदान खूप ओले झाले होते. खेळपट्टी कव्हर्सने झाकली होती, पण मैदानाचा उर्वरित भाग पावसामुळे मात्र ओला झाला. मैदानाचा एक भाग इतका ओला झाला होता की अथक प्रयत्नांनंतरही तो ओलाच राहिला. चार हेयर ड्रायर्सनेही सुकवण्याचा प्रयत्न केला पण तरीही मैदानाचा भाग सुकला नाही आणि सामना रद्द करण्यात आला.