आटपाडी शेळी-मेंढी बाजारात बोकडाची लाखाला विक्री

0
43

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीच्या प्रसिद्ध शेळी-मेंढी आठवडा बाजारात १४० किलो बोकडाची विक्रमी अशी एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपयांना विक्री झाली. या बोकडाला मिळालेल्या विक्रमी किमतीने विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला मोठा फायदा झाला आहे.

मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण सोमवारी (दि.१७) साजरा होत आहे. त्यामुळे आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शनिवार, दिनांक १५ रोजी शेळी-मेंढी खरेदी-विक्री बाजारात मोठी उलाढाल झाली. ईदच्या दिवशी कुर्बानीला महत्त्व असल्याने मुस्लिम बांधवांनी बोकड, शेळी, मेंढ्यांची खरेदी केली. त्यामुळे तब्बल एक लाख रुपयापर्यंतची किमत एका बोकडला मिळाली.

आटपाडी येथील बाजार समितीत दर शनिवारी शेळी-मेंढी बाजार भरतो. बकरी ईदच्या आधी येणाऱ्या शेळी-मेंढी बाजाराला विशेष महत्त्व असते. यावेळी बाजारात खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी झाली होती. पाच हजारां पासून लाखो रुपयांची शेळी-मेंढी खरेदी-विक्री झाली. एका बोकडला तब्बल दीड लाखाचा भाव मिळाला.

सांगोला येथील रियाज समीर शेख यांच्या मालकीचे तब्बल १४० किलो वजनाचे बोकड आटपाडी येथील बाजरात विक्री करण्यासाठी आणले होते. तर पंढरपूर येथील फिरोज अकबर शेख यांनी या बोकडाला विक्रमी असे १ लाख ११ हजार १११  रुपयांना त्यांनी विकत घेतले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांच्या दोन्ही शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेटफळेचे माजी उपसरपंच विजय देवकर, दिघंचीचे मुन्ना तांबोळी यांच्यासह शेतकरी व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here