विटा-मायणी रस्त्यावर पोलीस असल्याचे सांगत दोन लाखाचे दागिने लंपास

0
6

माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : पोलीस असल्याचे सांगून, नकली ओळखपत्र दाखवून पती-पत्नीकडील सुमारे दोन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास करण्याचा प्रकार विट्याजवळ मायणी रस्त्यावर घडला. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासो दगडू जाधव (वय ६६, रा. आगलावे मळा, गुरसाळे, ता. खटाव जि. सातारा) हे विटा-मायणी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने थांबवून पुढे भोसका-भोसकी झाली आहे. तुम्ही तुमच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने पिशवीत ठेवा असे सांगून दागिने पिशवीत ठेवत असताना हातचलाखी करून काढून घेतले.

 

दागिने घेऊन सदर अज्ञात व्यक्तीने दुचाकीवरून पोबारा केला. लंपास केलेल्या दागिन्यामध्ये दोन सोनसाखळ्या, एक ३५ ग्रॅम वजनाची तीनपदरी सोनसाखळी असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयाचे दागिने होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here