विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे : आटपाडीतील “या” कॉलेज मध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश व त्या संदर्भातील प्रवेश प्रक्रिया यासाठी मार्गदर्शन कक्ष सुरु

0
7

माणदेश एक्सप्रेस न्युज/आटपाडी/प्रतिनिधी : शिवाजी पॉलिटेक्निक आटपाडी मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कक्ष सुरु करण्यात आले आहेत. यासंदर्भात प्राचार्य ओंकार कुलकर्णी यांनी माहिती दिली.

ग्रामीण भागातील पालकांना व विद्यार्थ्यांना पालकांना डिप्लोमा (पदविका) प्रवेश संदर्भात विविध प्रकारच्या शंका व चिंता सतावत असतात. सदर शंकाचे निरसन करून पदविका प्रवेश प्रक्रिया सोप्या व सुलभ मार्गाने समजवण्याकरिता पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र महत्वाची भूमिका बजावत आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश अर्ज कसा भरावा, प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, त्याची पडताळणी, व पूर्तता करण्यासाठी काय करावे तसेच इंजिनिअरिंग च्या विविध शाखांचे महत्व व आवडीनुसार कोणती शाखा निवडावी? या सर्व शंकांचे निवारण करण्यासाठी मार्गदर्शन कक्ष सुरु करण्यात आले आहे. यासाठी प्रथम व द्वितीय वर्ष प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांना अनुभवी प्राध्यापक मार्गदर्शन करतील.

तरी आटपाडी तालुक्यातील व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्यावा असे अवाहन संस्थेचे अध्यक्ष तानाजी पाटील व सचिव शिवाजी पाटील व प्राचार्य ओंकार कुलकर्णी व सुविधा केंद्र व मार्गदर्शन कक्ष प्रमुख प्रा.रोहित पवार यांनी केले असून अधिक माहिती साठी संपर्क ७५५९१३९६७८ व ९४०४७१४९४७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here