सांगलीताज्या बातम्याराजकारण

सांगलीत ‘मशाल’ नव्हे तर…. ? एबीपी सी व्होटर्सच्या सर्व्हेतला अंदाज

सांगलीत महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत होती.

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : ४ जून रोजी सांगली लोकसभेचा निकाल लागणार आहे. या निकालाआधी आज एक्झिट पोल जाहीर केला जातो आहे. एबीपी सी व्होटर्सने सांगलीच्या जागेबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात महायुतीला २४ जागा तर महाविकास आघाडीला २३ जागा मिळतील असा अंदाज एबीपी सी व्होटर्सने वर्तवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाला ९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काँटे की टक्कर दिसणार आहे असं हा सर्व्हे सांगतो आहे. अशात सांगलीत धक्कादायक निकाल लागणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सांगलीच्या जागेवरून सुरूवातीपासूनच महाविकास आघाडीमध्ये वाद झाल्याचं दिसून आले. काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी मागच्या पाच वर्षांपासून तयारी सुरू केली असताना महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने परस्पर ही जागा चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय? याची चर्चा होईपर्यंत हा वाद ताणला आहे. सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी सुरुवातीपासूनच शिवसेनेला विरोध केला आणि ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी प्रयत्न केले. पण शेवटपर्यंत त्यांना यश आलं नाही आणि विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

विशाल पाटील जिंकणार असा अंदाज
सांगलीत महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत होती. या तिरंगी लढतीत विशाल पाटील मारतील त्यामध्ये आता विशाल पाटील बाजी मारतील असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button