महाराष्ट्रताज्या बातम्याव्हायरल व्हिडिओ

मामाच्या पोरीसाठी दोन सख्या भावांची तुफान हाणामारी ; प्रकरण थेट पोलीस ठाणेमध्येच ; पण मुलीचे दुसऱ्यावरच……

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधून एक अजब घटना समोर आलीय. भावाच्या मुलीला सून म्हणून घरात आणण्यासाठी महिलेनं आपल्या दोन्ही मुलांना घेऊन भावाचं घर गाठलं.

मुलगी पसंत पडल्याने मोठ्या मुलाने होकार दिला; पण इतक्यात लहान मुलानेही मुलगी पसंत असल्याचे सांगत चक्क तिच्यासोबतच लग्नाची इच्छा व्यक्त केली. यावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली. कपडे फाटेपर्यंत एकमेकांना मारलं. मात्र, सगळ्यात मोठा ट्विस्ट तर नंतर आला. भावांची भांडणं पाहून मामाच्या मुलीनेही आपले पत्ते उघडले. तिने सांगितलं की तिचं गल्लीतील दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे.

बहीण जामनेरातील आपल्या भावाकडे मुलगी पाहण्यासाठी आली. सोबत तिची दोन तरुण मुलेही होती. बहिणीने मोठ्या मुलासाठी भावाकडे मुलीची मागणी घातली. मोठ्या मुलाला मुलगी पसंत पडली. इकडे लहान मुलाने आपणासही मामाची मुलगी पसंत असल्याचे सांगत तिच्याशी लग्न करायचा हट्ट धरला. यावेळी उपस्थित नातेवाइकांनी लहान भावाला समजावले; पण तो हट्टालाच पेटला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. प्रकरण थेट जामनेर पोलिस स्टेशन गाठले, त्याची समजूत काढत घरी आणले.

इकडे मुलीने मात्र दोघांपैकी कुणाशीच आपल्याला लग्न करायचे नाही. आपले गल्लीतील एका तरुणावर प्रेम आहे. त्याच्याशी मी लग्न करणार असल्याचे सांगत सर्वांनाच धक्काच दिला. मुलीचा निर्णय ऐकून पाहुणी म्हणून आलेली बहीण दोघा मुलांसोबत आपल्या गावाकडे रवाना झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button