UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार सर्व्हिस

0
570

UPI पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. तुम्ही पण जर UPI पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण 4 ऑगस्ट 2024 रोजी यूपीआयने व्यवहार करता येणार नाहीये. आता हे सर्व ग्राहकांसाठी लागू आहे का असा प्रश्न पडला असेल. पण तसे नाही. हे फक्त HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी लागू असेल. कारण बँकेने या दिवशी शेड्यूल डाउनटाइम अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या कालावधीत कोणत्याही ऑनलाइन पेमेंट होणार नाही. पण ते दिवसभर असणार नाहीये. फक्त काही तासांसाठी बंद असेल.

एचडीएफसी बँकेने अधिसूचना जारी करत माहिती दिलीये की, रात्री 12:00 ते पहाटे 03:00 पर्यंत सिस्टम देखभालीचे काम केले जाणार आहे. या दरम्यान सर्व ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा बंद असणार आहे. एकूण 180 मिनिटांसाठी कोणतेही पेमेंट करता येणार नाही. याचा परिणाम बँकेच्या सर्व खातेदारांवर होणार आहे. ज्यामध्ये सेविंंग आणि करंट अकाऊंट असलेल्या लोकांचा समावेश आहे.

कोणत्या ॲप्सवर परिणाम होईल?
बँकेच्या या डाऊनटाईममुळे सर्व ॲप्सवर याचा परिणाम होणार आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही UPI पेमेंट करता. अधिसूचनेनुसार, तुम्ही HDFC मोबाइल बँकिंग ॲप, GPay, WhatsApp Pay, Paytm, Shriram Finance आणि Mobikwik वर पेमेंट करू शकणार नाहीत. याचा अर्थ सिस्टीम पूर्णपणे डाऊन असेल. पण POS च्या मदतीने केलेल्या व्यवहारांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही ते पेमेंटसाठी वापरू शकता.

काय करायचे आहे?
UPI पेमेंट डाउनटाईममध्ये तुम्हाला काहीही करायचे नाहीये. एचडीएफसी बँक काम पूर्ण झाल्यानंतर स्वतः सुरुवात करणार आहे. बँकांकडून हे अनेकदा केले जाते. नेटवर्क दुरुस्त झाल्यानंतर ते पुन्हा सुरू केले जाणार आहे. तुम्हाला नॉन-पेमेंट दरम्यान नक्कीच काही त्रास होईल, परंतु एकदा ते पुनर्संचयित झाल्यानंतर, तुम्ही ते सहजपणे वापरू शकता.

एचडीएफसी बँकेशिवाय, इतर अनेक बँका देखील देखभाली करता असा डाऊनटाईम घेतात. यामुळे बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली जाते. वास्तविक हा डाऊनटाईम नेटवर्क वाढवण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी केले जाते. या कालावधीत देयके बंद केली जातात.