“जिंकायचं असेल तर झुकायचं नाही”, झेब्राने केला मगरीचा मोठा गेम! मगरीला दिला जबरदस्त चकवा; ‘हा’ Video थक्क करून सोडेल!

0
167

Crocodile Vs Zebra Fight Video: प्राण्यांचे जग हे नेहमीच रहस्यांनी भरलेलं आणि थरारक असतं. इथे कोण केव्हा शिकार बनतो, हे सांगणं खरंच कठीण आहे. कारण अनेकदा असं घडतं की, जो स्वतः शिकारी आहे, तोच एका क्षणी शिकार होतो. या जगात जगण्यासाठी फक्त ताकद पुरेशी नसते. चपळाई, सजगता आणि प्रसंगावधानही तितकंच गरजेचं असतं.

 

मगर ही किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. एका फटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करण्याची क्षमता मगरीमध्ये असते. मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. पण झेब्राने मगरीला टक्कर दिली अन् धडा शिकविला नेमकं काय घडलं जाणून घ्या..

 

जंगलातील जीवसृष्टीतील संघर्ष, जगण्यासाठीची धडपड व जिद्दीचा थरार पाहायला मिळतोय एका जबरदस्त व्हायरल व्हिडीओमध्ये, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय. या व्हिडीओत एक झेब्रा नदी पार करत असताना मगर त्याच्यावर जोरदार जीवघेणा हल्ला करते.

 

सुरुवातीला सगळं ठरलेलं वाटतं. झेब्य्राला मगरीनं आपल्या कराल जबड्यात पकडलं आहे आणि काही क्षणांसाठी सगळ्यांना वाटतं की, आता त्याचं शेवटचं पान लिहिलं जाणार. पण, झेब्य्रानंही जणू ठरवलं होतं. “आज नाही!” त्यानं जे केलं, ते पाहून प्रेक्षकही थक्क झाले. झेब्य्रानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केवळ कसोशीनं प्रयत्नच केला नाही, तर थेट मगरीच्या जबड्यावर जोरात दात रोवले. होय, झेब्य्रानं त्या भयानक भासणाऱ्या मगरीवर असा पलटवार केला की, मगरही क्षणभरासाठी गडबडून गेली.

 

 

या दोन्ही प्राण्यांच्या जबड्यांच्या लढाईत अखेर मगरीनं आपली पकड सैल केली आणि त्याचा फायदा घेत झेब्य्रानं झपाट्यानं किनाऱ्याकडे धाव घेतली. झेब्य्राची प्राण वाचविण्यासाठीची ती जिद्द अन् शिकस्त पाहून लोकांनी या झेब्य्राला ‘जंगलचा गँगस्टर’ असं नाव दिलंय.

 

नेटिझन्सनी कमेंट्समध्ये झेब्य्राची प्रशंसा करीत त्याला “मोटिवेशनल हिरो”, “जंगलचा शेर” व “प्रेरणादायी योद्धा” असं म्हटलं आहे. एकानं लिहिलं, “जेव्हा आयुष्य दाव्यावर लागतं, तेव्हा झेब्य्रासारखं झुंजायचं!” दुसऱ्यानं लिहिलं, “मगरसुद्धा आता जंगलात हसण्याचं कारण बनला असेल.”

 

या व्हिडीओतून एक गोष्ट शिकायला मिळते, “परिस्थिती कितीही बिकट असो; हार मानू नका… शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली, तर जिंकता येतं.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here