आटपाडीच्या साखर कारखान्याच धुराड मीच चालू करणार : जयंत पाटील

0
166

माणदेश एक्सप्रेस न्युज/ खानापूर / मनोज कांबळे : आटपाडीच्या साखर कारखान्याचा धुराड मीच चालू करणार असल्याचे खानापूर येथील जाहीर सभेत जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. कोणाला कसं वागायचं तसं त्यांनी वागावं पण आटपाडीचा साखर कारखाना आम्ही चालू करणार असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, बाबासाहेब मुळीक प्रमुख उपस्थित होते.

 

 

 

 

टेंभू योजनेला निधी देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्र व्हावे यासाठी वैभव पाटील यांनी प्रयत्न केले. पुढील काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर खानापूर येथील उपकेंद्रासाठी निधी देण्याचे काम आम्ही करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

यावेळी शिवसेनेचे शेखर निचळ, राष्ट्रवादीचे हनुमंतराव देशमुख, राजू जानकर, संतोष जाधव विष्णुपंत पाटील, सुवर्णा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.