“पाहिजे तेवढे पैसे आत्ताच देईन ,पण …” लोकांनी घेरताच ओरडू लागला पोर्श कार अपघातातील आरोपी

0
4

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आजोबा आणि वडिलांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तसंच, अल्पवयीन मुलांना दारू दिल्याप्रकरणी बारचालकांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. या सगळ्यात आता घटनास्थळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शीही पुढे येऊ लागले आहेत. आतापर्यंत दोन प्रत्यक्षदर्शींनी संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती दिली आहे.

त्यापैकी अमीन शेख याने दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ज्यावेळी अल्पवयीन मुलाला तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी मारहाण केली तेव्हा मुलगा ओरडत होता. ‘तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे घ्या, मला मारहाण करू नका, मी पाहिजे तेवढे पैसे आत्ताच देईन.’ असं तो वारंवार म्हणत असल्याचं अमीन शेखने सांगितलं.